इकडील वर्तमान तरी श्रीमंत माघ शुध्द पंचमीस पुणियास दाखल जाहले (२१.१.१७७१) शरीर प्रकृती चांगली आहे कर्नाकटात राजश्री त्रिंबकराव मामा आहेत यंदा फ़ौजा तिकडे दाहा पंधरा हजारपर्यंत राज श्री कृष्णराव बळवंत यांज बरोबर मामांकडे रवाना केल्या. ब गाजीपंत व सदाशिवपंत करमरकर दोघे कारकून आपले कडील समागमे दिल्हे.........
या पत्रावरुन असे दिसते की थोरल्या माधरावांनी कृष्णराव बळवंत यांच्या बरोबर सदाशिवपंत करमरकर यांना कर्नाटकाच्या मोहिमेवर कारकुन म्हणुन पाठविले असावे (वाचनात आलेला हा पाहिला उल्लेख).यानंतर उल्लेख मिळतो तो सदाशिवपंत करमरकरांनी ७.१२.१७७३ रोजी कुणाला तरी पाठविलेल्या पत्रात (2b)राघोबादादा पेशवे असताना इतर मुत्सद्यानी त्यांच्याविरुद्ध केले ल्या कारस्थानच्या हा काळ आहे.
पौ छ २२ रमजान
(७.१२.१७७३)
श्री गजानन
सेवेसी सदासिव अनंत करमरकर कृतोनक साष्टांग नमस्कार विज्ञापना बुनग्यात पथके नेमली आहे त त्यापैकी येथे आली नाहीत पथके बितपसील आ:-
............
............
येकुन दोनसे पधरा स्वार सडेस्वारीत गेले आहेत.त्यास ताकीद होऊन येथे येत ते केले पाहिजे रवाना छ २२ रमजान सेवेसी श्रूत होय हे विज्ञापना या पत्रात जे दोनशे स्वार परत आलेले नाहित त्यांना ताबडतोब परत येण्यासाठी आज्ञा करण्याची विनंती सदाशिवपंताना केलेली दिसते.या नंतरच्या १४.१२.१७७३ च्या पत्रात (2c)ना ना फ़ ड्णीसानी त्रिबंकरावाच्या कॅपमधुन हकीगतीचा पत्र व्यवहार वरचेवर न केल्याबद्दल सदाशिवपंत करमरकरांना समज दिलेली आहे यावरुन राघोबाला शह देण्याचा मोहिमेत त्रिंबकराव मामा पेठे याच्याबरोबर सदाशिवपंत करमरकर असले पाहिजेत. या वरच्या इतिहासावरुन सदाशिवपंत करमरकर थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीत उदयास आले.असावेत राघोबाला काबुत आणण्याचा मोहिमेतही ते सहभागी होते नारायणराव राघोबा यांच्या कारकीर्दीनंतर सवाई माधवरावांची कारकीर्द सुरु झाली या काळातही सदाशिवपंताचा उल्लेख सापडतो तो असा-
सेनापती-हरिपंत फ़डके:मदतनीस करमरकर(3e)
सवाई माधवराव पेशवे झाल्यावर राघोबादादांचा बंदोबस्त करण्यासाठी हरिपंत फ़डके यांना सेनापती नेमले या नेमणूकीला राजश्री सखारामपंतबापु नाना फ़डणीस आनंदराव रास्ते विंचुकर परशुरामभाऊ पटवर्धन व मानकरी घोरपडे निबांळकर जाधव भोईटे आदि सर्वांना अनुमती दिली.मग हरिपंत फ़डके याजकडे फ़ौजेचे काम सागिंतले तेव्हा हरिपंत फ़डके यांचे हाताखाली दुसरा कोणी नेमला पाहिजे तेव्हा सर्वांच्या मते बापु यांणी सांगितले असता नाना फ़डनीस यांचे मनास ती गोष्ट आली मग सदाशिव अनंत करमरकर यांस समक्ष बोलावुन सरकारची आज्ञा झाली की तुम्ही हरिपंत यांचे समागमे जावे हरिपंत सांगतील तसे वर्तावे" (3e)
j)पान 212
|